×

Dinesh Kartik बाबा झाला, पत्नी Dipika Pallikalने जुळ्या मुलांना दिला जन्म!

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) सिनियर विकेटकीपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकच्या (Dinesh Kartik) घरामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. दिनेश कार्तिकच्या घरामध्ये दोन नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दिनेश कार्तिक बाबा (Dinesh Karthik Become Father of Twin Boys) झाला आहे. दिनेशची पत्नी आणि प्रसिद्ध स्कॉशपटू दीपिका पल्लीकलने (Dipika Pallikal) जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. गुरुवारी...

user-circle cricketcountry.com Written by India.com Staff
Published: Oct 29, 2021, 01:59 PM (IST)
Edited: Oct 29, 2021, 01:59 PM (IST)

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) सिनियर विकेटकीपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकच्या (Dinesh Kartik) घरामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. दिनेश कार्तिकच्या घरामध्ये दोन नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दिनेश कार्तिक बाबा (Dinesh Karthik Become Father of Twin Boys) झाला आहे. दिनेशची पत्नी आणि प्रसिद्ध स्कॉशपटू दीपिका पल्लीकलने (Dipika Pallikal) जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. गुरुवारी दोघांनीही आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन (Twitter Account) आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकलने (Dinesh Kartik And Dipika Pallikal Marriage) 2015 मध्ये लग्न केले. दोघांनी हिंदू आणि ईसाई रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले होते. दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल या दोघांनी आपल्या चाहत्यांसोबत आनंद शेअर करताना सांगितले की, ‘आता आम्ही तिघांचे पाच झालो आहोत.’ दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर (Social Media Account) घरातील पाच सदस्यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिनेश कार्तिक आणि दीपिका आपल्या दोन नवजात मुलांसोबत दिसत आहे. तसंच या दोघांच्यामध्ये त्यांचा लाडका पेट्स देखील दिसत आहे.

TRENDING NOW

दिनेश कार्तिकने ट्वीटमध्ये (Dinesh Kartik Tweet) असे लिहिले आहे की, ‘आणि हे असं आहे की आम्ही आता तिघांचे पाच झालो आहोत. दीपिका आणि मला दोन मुलं झाली आहेत.’ या जोडप्याने आपल्या दोन नवजात मुलांची नावे देखील जाहीर केली आहेत. एका मुलाचे नाव कबीर पल्लीकल कार्तिक (Kabir Pallikal kartik) तर दुसऱ्या मुलाचे नाव जियान पल्लीकल कार्तिक (Jiyan Pallikal Kartik) असे ठेवले आहे. त्यांनी पुढे असे लिहिले, ‘यापेक्षा जास्त आनंद होऊ शकत नाही.’ या जोडप्याने मुलांच्या आडनावांमध्ये आई आणि वडील दोघांच्या आडनावांचा समावेश केला आहे.